आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ६८१ वनपट्टे धारक आ

 आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ६८१ वनपट्टे धारक आदिवासी बंधु भगिनीं यांना ७/१२ उतारे वाटप


चोपडा दि.१७(प्रतिनिधी महेश शिरसाठ)* चोपडा येथील कर्तव्यदक्ष आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते ६८१ वनपट्टे धारक आदिवासी बंधु भगिनीं यांना ७/१२ उतारे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा श्री अनिलजी गावित  तहसीलदार चोपडा, संजीव शिरसाठ आदिवासी समाज सेवक चोपडा, देवेंद्र नेतकर पुरवठा अधिकारी चोपडा, सौ शितल देवराज सरपंच,मा बुधादादा बारेला जेष्ठ समाज सेवक, प्रताप पावरा सरपंच मेलाणे, दत्तरसिंग पावरा सरपंच वैजापुर, प्रल्हाद पाडवी सरपंच देव्हारी, दिलिप पावरा उपसरपंच मेलाणे,सुकलाल कोळी, अनिल पावरा, नामसिंग पावरा, ताराचंद पाडवी, विजय कचवे सर,मयुर बारेला,बबलु बारेला,नका बारेला,ईदा बारेला,बियाणु बारेला,या गंगाराम बारेला, लकडादादा बारेला,हे उपस्थित होते.

 सौ लताताई सोनवणे आमदार यांचा सत्कार वैजापूर सरपंच दत्तरसिंग पावरा यानी केला. अनिल गावित  यांचा सत्कार गोविंद बारेला यांनी केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  समाधान सोनवणे  वनक्षेत्रपाल यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव शिरसाठ यांनी केले.आभार दत्तरसिंग पावरा,बुधा बारेला यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने