*रक्तदान - महादान भव्य रांगोळी स्पर्धा 2022 चे चोपडा नगरीत आयोजन* ......
चोपडा ,दि.१७(प्रतिनिधी): इंडियन रेड क्रॉस सोसायटी चोपडा व ललित कला केंद्र चोपडा* यांच्या संयुक्त विद्यमानाने *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वर्षे निमित्त रक्तदान महादान या भव्य रांगोळी स्पर्धा 2022* चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला *रक्तदान महादान* हा विषय देण्यात आला होता .या स्पर्धेसाठी जवळपास 35 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
रक्तदान करा । रक्तदानाने ..जीव वाचवा । रक्तदान काळाची गरज । रक्तदान राष्ट्रीय कार्य रक्तदान जीवदान रक्तदानाने असे अनेक कितीतरी फायदे सुचविणारे घोषवाक्यांसह एकापेक्षा एक सुंदर आकार आणि रंगसंगतीसह आकर्षक व लक्षवेधी रांगोळ्या स्पर्धकांनी काढल्यात. काळावर मात करून रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचविता येतात अशी जनजागृती करणाऱ्या या रांगोळी प्रदर्शनाचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
या स्पर्धा व प्रदर्शनाचे नियोजन प्राचार्य राजेंद्र महाजन ललित कला केंद्र, चोपडा यांनी केले . तसेच प्राध्यापक संजय नेवे आणि प्राध्यापक विनोद पाटील यांनी परीक्षण केले. तर दिव्या पाटील स्वरूप पाटील आणि सुरेश बारेला यांनी यशस्वीतेसाठी मेहनत घेतली .
यामध्ये प्रथम - नम्रता गोपाल अग्रवाल, द्वितीय - प्राप्ती अतुल पाटील, तृतीय - शितल निलेश देसाई तर दीपप्रिया शैलेश जैन आणि नम्रता दिलीप सावकारे यांना उत्तेजनार्थ अशी बक्षिसे देण्यात आली .तर प्रत्येक स्पर्धकास शंभर रुपये रोख प्रमाणपत्र आणि पेन अशी भेट वस्तूही देण्यात आली .
इंडियन रेड क्रॉस सोसायटी चोपडा चे अध्यक्ष डॉ. आर. सी. गुजराथी, श्यामभाई गुजराथी तर सेक्रेटरी परेश टिल्लू,प्रवीणभाई गुजराथी,सुनील माळी, सौ.छायाबेन गुजराथी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.