चोपडा बी फार्मसी महाविद्यालयात लुपिन फार्मास्युटिकल तर्फे परिसर मुलाखतींचे आयोजन

 चोपडा बी फार्मसी महाविद्यालयात लुपिन फार्मास्युटिकल तर्फे  परिसर मुलाखतींचे आयोजन


चोपडा दि.१४(प्रतिनिधी)श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व औषधनिर्मिती  क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ल्युपिन फार्मा, इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात विद्यार्थ्यांनची अखंड हीत परंपरा जपत परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ पत्रकार श्री. श्रीकांत नेवे तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री. एन एस. सोनवणे सर यांनी केले. सदर मुलाखतीस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चोपडा महाविद्यालय तसेच इतर औषधनिर्माणशास्त्र व इतर (एम एस्सी) महाविद्यालयातून एकूण १०८ विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुलाखती साठी डी फार्म, बी फार्म , एम फार्म व एमएससी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदर मुलाखतीस ल्युपिन फार्मातर्फे श्री. विजय वाचपेयी (HR Head), श्री. गौरव शर्मा (Executive HR) श्री. अमरनाथ प्रकाश (Senior Manager Production) व श्री. शैलेश जोशी (Senior Manager Production) यांनी मुलाखती घेतल्या. सदर मुलाखतीत २७  विद्यार्थ्यांची विविध विभागात निवड करण्यात आली. लुपिन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेऊन प्रशंसा केली व येणाऱ्या काळात सुद्धा पुढील असे आयोजन पुन्हा करण्यात येईल याची  ग्वाही दिली.  मुलाखतीच्या आयोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील, सचिव सौ. डॉ. स्मिताताई संदीप पाटील, प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर मुलाखतीच्या आयोजनासाठी ट्रैनिंग  व प्लेसमेन्ट विभागप्रमुख प्रा. क्रांती पाटील, प्रा प्रेरणा जाधव ,प्रा. कुंदन पाटील, सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने