सत्रासेन गावात रस्त्यावर पाणी च पाणी.. ग्रामपंचायतीच्या दूर्लक्षाने गावकरी समस्यांच्या विळख्यात*

 

सत्रासेन गावात रस्त्यावर पाणी च पाणी.. ग्रामपंचायतीच्या दूर्लक्षाने गावकरी समस्यांच्या विळख्यात

सत्रासेन ता.,चोपडा दि.१४( प्रतिनिधी श्रीराम गायकवाड ) तालुक्यातील सत्रासेन  गावात नळांचे पाणी रस्त्यावर साचून मोठं मोठे खड्डे पडले असून डबक्यांमुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सरपंच व ग्रामसेवक भाऊसाहेबांनी दूर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त करत  लवकरात लवकर सदरील समस्येचे निराकरण न केल्यास वरीष्ठ पातळीवर तक्रार करून धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

गावातील गटारींचे व नळांचे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडत आहेत त्याकडे  सरपंचांचा आणि सदस्यांचा परिपूर्ण दूर्लक्ष करीत असून वाहणाऱ्या गटारींचे व नळांचे पाण्याकडे  काना डोळा करत आहेत. गटारींचे पाणी व नळांचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने येणाऱ्या - जाणाऱ्या प्रवाशांना  वाहतुकी साठी खुप मोठा अडथळा निर्माण झाला आहे  गटारींचे पाण्यामुळे परिसरातील लोकांचा दुर्गंधी पसरत असल्यामुळे  परिसरातील राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला व जीवाला धोका निर्माण होऊ पाहत आहे याकडे सरपंच व सदस्याना योग्य ती चौकशी करून  समस्येचे निराकरण करावे अन्यथा गावकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने