भवाळे येथे पेरणीपूर्व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
गणपूर(ता चोपडा)ता 3:महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, धुळे येथील कृषिदुतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत भवाळे येथे हरभरा पिकासाठी बीजप्रक्रियेचे रासायनिक व जैविक प्रात्यक्षिक करून दाखवले. बियाण्यावर प्रक्रिया का करावी? कशी करावी? कोणती खबरदारी घ्यावी? आणि प्रक्रिया करण्याचे फायदे आणि महत्त्व काय आहे? या आणि इतर बाबींवर प्रात्यक्षिकामधे चर्चा झाली.
यावेळी कृषिदूत मयुर गुंजाळ, प्रथमेश बयाणी,वैभव कच्छ्वा , कल्पेश खैरनार , मनिष मगर, जयदीप पाटील यांनी बीज प्रक्रियेची माहिती दिली. सुवर्णसिंग सिसोदिया यांच्या शेतात हरभरा बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकासाठी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यासाठी अधिष्ठता डॉ.सी.डी.देवकर,रावे समन्वयक डॉ.संदिप पाटील, चेअरमन डॉ.पी.एन.शेंडगे,सहयोगी अधिष्ठता प्रतिनिधी डॉ. सुनिल पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.पी.पौळ आणि विषयतज्ञ(SMS) प्रा.जे.एस.सूर्यवंशी यांचेही मार्गदर्शन मिळाले.........भवाळे(ता चोपडा)बीज प्रक्रिया प्रसंगी उपस्थित कृषिदूत व शेतकरी
