चोपडा येथे आज पासून 18 दिवसीय कीर्तन महोत्सव..प्रथम पुष्प ह भ प के डी चौधरी गुंफणार

 चोपडा येथे आज पासून 18 दिवसीय कीर्तन महोत्सव..प्रथम पुष्प ह भ प के डी चौधरी गुंफणार* 





*चोपडा,दि.०३(प्रतिनिधी) संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा या संस्थेतर्फे दिनांक 4 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत रोज रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे. 18 दिवस चालणाऱ्या  कीर्तन महोत्सवाचे प्रथम पुष्प ह भ प के. डी. चौधरी सर हे गुंफणार असून या कीर्तन महोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कार्यास लागले असून ह भ प बापू महाराज, ह भ प गोपीचंद महाराज, ह भ प तेजस महाराज व तालुक्यातील सर्व सत्संग मंडळी वारकरी संप्रदायातील मंडळी या कीर्तन महोत्सवासाठी प्रयत्नशील आहेत. संस्थेचे अध्यक्ष के. डी. चौधरी, उपाध्यक्ष टी. एम. चौधरी ,सचिव भिका चौधरी, सहसचिव प्रशांत चौधरी, कोषाध्यक्ष राजेंद्र चौधरी विश्वस्त सर्वस्वी श्री देवकांत  के. चौधरी, महेंद्र चौधरी, संजय चौधरी, नंदू चौधरी, शामकांत चौधरी, किरण चौधरी ,आबा चौधरी, छोटू चौधरी, दीपक चौधरी, गुलाब चौधरी, आदींनी कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. किर्तन महोत्सवात गुरुपरंपरेवर आधारित अभंगांवर निरूपण होणार असून तसे अभंग प्रत्येक कीर्तनकार महाराजांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक कीर्तन हे श्रवणीय असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने