मुंबईच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे साथी सुभाष लोमटे यांना बाबूराव सामंत संघर्ष पुरस्कार..!!

 मुंबईच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे साथी सुभाष लोमटे यांना बाबूराव सामंत संघर्ष पुरस्कार..!!


चोपडा दि.२( प्रतिनिधी):  केशव गोरे स्मारक ट्रस्ट चे वतीने, बाबूराव ( प.बा.) सामंत संघर्ष  पुरस्कार या वर्षी ,  गोरगरीब कष्टकरी , हमाल-मापाडी कामगार ,बांधकाम कामगार  मोलकरणी,कचरावेचक महिला, भूमीहीन शेतमजुर व कष्टकरी शेतकरी आणि अन्य असंघटित कष्टकऱ्यात काम करणारे  औरंगाबाद येथील समाजवादी नेते साथी *सुभाष लोमटे*  यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

     साथी सुभाष लोमटे यांचा देशभरातील कष्टकरी व परिवर्तनवादी चळवळीत सहभाग राहिला असून , ते जागतिकीकरण विरोधी कृती समिती , भ्रष्टाचार विरोधी व लोकपाला साठी झालेले राष्ट्रीय आंदोलन , राष्ट्रीय ग्रामीण मजदुर अभियान समिति, राष्ट्रीय किमान वेतन अभियान समिती , विश्व सामाजिक मंच इ. जनआंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. ..... तसेच संयुक्त किसान मोर्चा चे नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनात ही सक्रिय सहभाग होता..... त्याच बरोबर अनेक प्रश्नांच्या संघर्षामध्ये सक्रिय सहभाग होता, ज्यात नामांतराच्या आंदोलनात  महिनाभराचा येरवडा जेल, हमालांचे प्रश्नावर १३ दिवसाचे बेमुदत उपोषण, शेतमजूर व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्यागृह इ. सामावेश आहे......

 ््  सार्वजनिक संसाधनांचा उपयोग तळागाळातील लोकांसाठी झाला पाहिजे असा आग्रह धरणारे, घटनेच्या चौकटीत राहून कायद्याचे अस्त्र लोकांच्या हितासाठी वापरणारे, ‘जनहित याचिका’ हा शब्दप्रयोग प्रचलित करणारे, बॅ. ए. आर. अंतुले यांच्या सिमेंट भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयीन लढा देणारे, सर्वसामान्यांच्या निवारा हक्कासाठी लोकसहभागातून संघर्ष करत नागरी निवारा वसाहत उभारणारे बाबुराव (प.बा.) सामंत यांच्या स्मृती जागवण्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार *सुभाष  लोमटे* यांना दिला जात आहे. 

 *शनिवार, १५ ऑक्टोबर २०२२* रोजी बाबुराव (प.बा.) सामंत संघर्ष पुरस्कार  प्रसिद्ध नाट्य दिगदर्शक *चंद्रकांत कुलकर्णी* यांच्या हस्ते *सुभाष लोमटे*  यांना प्रदान करण्यात येईल . या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान *प्रा . सुभाष वारे* ,भूषविणार आहेत. *संध्याकाळी ६ वाजता केशव गोरे स्मारक ट्रस्ट* , आरे रोड, गोरेगाव पश्चिम इथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन केशव गोरे स्मारक ट्रस्ट चे कार्यकारी विश्वस्त प्रमोद निगुडकर यांनी केले आहे.....

या निवडी बद्दल साथी प्रविण सरकटे,साथी संजीव शिरसाठ,साथी चंद्रकांत चौधरीयांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने