"आफताब"ला फाशीची शिक्षा द्या.. हिंदू महिलांचा आवाज गरजला.. चोपडयात विविध संघटनांचा महाकाय जन आक्रोश मोर्चा
चोपडा दि.२८(प्रतिनिधी ):हिंदु महिलांची सुरक्षा आणि सन्माना साठी व श्रध्दा वालकर या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच नराधम आफताबला फाशीची शिक्षा मिळावी या मागणीकरीता आज रोजी सकाळी १० वाजता विश्राम गृहापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेनरोड मार्गे तहसिल कार्यालय शेवट गांधी चौक येथे अशी भव्य रॕली काढण्यात आली. यामध्ये हजारोंच्या संख्येत हिंदु बांधव व भगिनी सहभागी झाले. या मोर्चाचे नेतृत्व महिलांनी केले हे विशेष तसेच शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवत या मोर्चात सहभागी झाले.
या विराट मोर्चाची सुरुवात विश्रामगृहा पासून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. रॕलीमध्ये “श्रद्धा हम शर्मिंदा है, तेरा कातील जिंदा है”, “आफताबला फाशी, झालीच पाहिजे” “वंदे मातरम” व “भारत माता की जय” आदि घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.
हिंदू जागरण मंच तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या आवाहनामुळे स्वयंस्फूर्तपणे हिंदु बांधव यामध्ये सहभागी झालेत. गांधी चौक येथे जळगांव महानगरपालिका नगरसेविका अॕड. सुचिता हाडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक विद्यार्थी परिषद विद्यार्थीनी चोपडा शहरमंत्री कोमल गोसावी यांनी तर आभार हिंदु जागरणा मंचाचे जिल्हा युवा आयाम प्रमुख डॉ. राहुल पाटील यांनी मानले. यावेळी तहसीलदार अनिल गावीत व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. सदर मोर्चामध्ये हिंदु जनजागरण मंचासह सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच सर्वपक्षीय सहभागी होते. संपुर्ण मोर्चादरम्यान शहर पोलीस स्टेशनचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.