राज्य विक्रीकर निरीक्षकपदी उमेश शिरसाठ यांची निवड

 राज्य विक्रीकर निरीक्षकपदी उमेश शिरसाठ यांची निवड         

   




 गणपूर(ता चोपडा)ता 27 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2021 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल लागला असून गणपूर तालुका चोपडा येथील उमेश भटू शिरसाठ(पाटील)यांची राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली आहे.         उमेश शिरसाठ सामान्य शेतकरी कुटुंबातील असून आई व वडील अल्प शिक्षित आहेत.मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी ही बाजी मारली आहे.अजूनही काही परीक्षांचे निकाल बाकी असून त्यातही आपल्याला यश येईल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी  सांगितले.राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांची बँड च्या तालावर घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या यशाबद्दल मित्रांसह अनेक अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने