*संविधान दिनानिमित्त भव्य कवी संमेलन*
जळगाव दि.२८(प्रतिनिधी) 26 नोव्हें.2022 रोजी संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स ( बानाई) जळगाव व म. फुले, रा. शाहू महाराज, डॉ. आंबेडकर साहित्य मंच आणि समाज कल्याण विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय हॉल, आंबेडकर भवन ,समाज कल्याण विभाग, मायादेवी नगर ,जळगाव येथे दुपारी 3.00 वाजता भव्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले .
सदरहू कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.भगवानजी भटकर (प्रसिद्ध कवी )तसेच मा.डॉ.गणपतजी धुमाळे (मणियार विधि महाविद्यालय) लाभले होते. कार्यक्रमाचे उद्घघाटन मा.अरूण वाणी (कार्यालय अधिक्षक ,समाज कल्याण विभाग, जळगाव )यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी शिक्षणक्षेत्रातीलमा श्री .अजय देशमुख (ग.स.सोसायटी निवड)तसेच मा.गुलाब चव्हाण(मुख्या.राष्ट्रीय विद्यालय) या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील कवी कवयित्री मोठ्या संख्येने सहभागी झालेली होती .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. वर्षा पगारे यांनी केले तर प्रास्ताविक श्रीम.ज्योती वाघ यांनी केले.कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकेचे वाचन चित्रा पगारे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयोजक श्री.आर.जे .सुरवाडे ,सुशांत मेढे,राहुल तायडे यांचे मोलाचे योगदान लाभले..सदरहू कार्यक्रमास म.फुले रा. शाहू व आंबेडकर साहित्य मंचचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमात निवृत्ती कोळी, पुष्पलता कोळी, डी.डी.पाटील ,मंगलाताई रोकडे इंदिरा जाधव, भिमराव सपकाळे, रमेश धुरंधर ,आर.डी.कोळी, डाॅ.प्रदिप सुरवडकर, ज्योती वाघ, चित्रा पगारे, संतोष साळवे, प्रभावती पाटील अरूणकुमार जोशी ,गोविंद देवरे प्रकाश पाटील ,प्रविण लोहार,किशोर पाटील, शहानुर तडवी, प्रविण महाजन, संगिता महाजन ,अशोक पारधे ,आशा साळुंखे , कवी भुते, एस्.पी.झाल्टे किशोर नेवे, गणेश निकम, बोधिसत्व अहिरे ,राहुल तायडे यांनी दर्जेदार कविता सादर केल्या अतिशय मोठ्या उत्साहात कविसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला.आभारप्रदर्शन भीमराव सपकाळे यांनी केले.