कै. हि मो करोडपती माध्यमिक विद्यालय चोपडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

 कै. हि मो करोडपती माध्यमिक विद्यालय चोपडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन



 चोपडा दि.२९(प्रतिनिधी) येथील कै.हि मो करोडपती माध्यमिक विद्यालय चोपडा येथे स्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथिनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी व्हि बाविस्कर हे होते. सुरुवातीला समाज क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक ,शिक्षक बंधू भगिनी यांनी पूजन केले. यावेळी मुख्याध्यापक डि व्ही बाविस्कर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज कार्याची माहिती दिली.स्रीशिक्षण, विधवा विवाह, सत्यशोधक चळवळ व    बाल हत्या प्रतिबंधगृह ची स्थापना या विषयी माहिती दिली.ज्येष्ठ शिक्षक श्री आर आर बडगुजर,श्री मंगेश भोईटे , श्री ए पी बडगुजर, श्रीमती एस टी बोरसे, श्रीमती सी पी बडगुजर,श्रीमती पी सी बडगुजर , संजोग बडगुजर ,अशोक बडगुजर,विलास सनेर व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने