विद्यार्थ्यांना ज्ञान दानासोबत आरोग्याची काळजी घेण्यात चोपडयात महाजन इंग्लिश क्लासेस आघाडीवर ..विद्यार्थ्यांचे 'दंत चिकित्सक' शिबीर उत्साहात

 विद्यार्थ्यांना ज्ञान दानासोबत आरोग्याची काळजी घेण्यात चोपडयात महाजन इंग्लिश क्लासेस आघाडीवर ..विद्यार्थ्यांचे 'दंत चिकित्सक'  शिबीर उत्साहात

 *चोपडा दि.३०(प्रतिनिधी )* येथील नामांकित महाजन इंग्लिश क्लासेस हे ज्ञानदानासोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आघाडीवर असून नुकतेच दंत चिकित्सा शिबीर घेऊन विद्यार्थ्यांना मोफत सेवा देण्यात आली आहे.क्लासचे संचालक दीपक महाजन सरांनी वयाप्रमाणे लहान विद्यार्थी चॉकलेट,कॅटबरी खाण्यात  पुढे असल्याचे वेळेवर हेरून दंत तपासणी करून मोलाचा हात दिला आहे



चोपडा शहरातील प्रतिष्ठित 'महाजन इंग्लिश क्लासेसमध्ये  विद्यार्थ्यांसाठी  वैयक्तिक पातळीवर वेग वेगळे उपक्रम राबविले जातात. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दांताच्या  समस्या अधिक उद्भवत असतात म्हणून क्लासचे संचालक श्री. दिपक महाजन सर यांनी दंत चिकित्सक डॉ. राहुल साळुंखे  यांच्या मदतीने इयत्ता ५ वी च्या विदयार्थ्यांचे दात तपासुन  घेतले. आरोग्याशी निगडीत प्रश्नावर मार्ग दर्शन  करत आहाराचे महत्व  पटवुन दिले.  प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करून  दाताच्या समस्या बाबत मार्गदर्शन करून मोफत दंत पेस्ट वाटप केल्या.  बऱ्याच विदयार्थ्यांना दाढाच्या समस्या व किड  निघाल्यात  योग्यवेळी  निदान होत असल्याने पालक वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. 

दीपक महाजन सर हे विद्यार्थी कर्म मानून' कर्म हिच पूजा 'समजून  विद्यार्थ्यांची ज्ञानासोबत आरोग्याची काळजी घेत  असतात म्हणून अशा  समाजपयोगी कार्यामुळे  सरांच्या कार्याचे कौतुक करत क्लासेसचा नावलौकीक  आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने