अतिक्रमणे बाबत सरकारचे सकारात्मक प्रतिसाद बद्दल राष्ट्रीय जनता दलाचे प्रशांत बोरकर यांनी केले स्वागत

 अतिक्रमणे बाबत सरकारचे सकारात्मक प्रतिसाद बद्दल राष्ट्रीय जनता दलाचे प्रशांत बोरकर यांनी केले स्वागत

जळगाव दि.३०(प्रतिनिधी):राष्ट्रीय जनता दल चे नेते श्री  प्रशांत बोरकर आणि भूमी मुक्ती मोर्चा चे प्रमुख भाई प्रदिव  अंभोरे यांनी महाराष्ट्र मधील अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वात प्रथम आवाज उठवला आणि जळगाव जिल्हा प्रशासना चे अनेक   अधिकारी यांचेशी मुद्देसूद चर्चा  केली  तसेच यासंदर्भात आदिवासी ओबीसी मागास आदी बहुजन समाजातील गरीब लोकांवर अनयाय होत असून त्याबाबत विधानसभा वर मोर्चा काढण्यात येणार असे जाहीर केले होते . त्यावरून मागणीचे पोस्ट प्रचान्ड वायरल झाले  त्यांनंतर अन्य काही नेत्यांची हालचाली सुरू झाल्या 

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात महसूल विभागाने संबंधितांना नोटिसा बजावल्‍या आहेत. परंतु, या गरीबांची घरे निष्कासित करणे  योग्य नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रहपूर्वक मांडले. त्यांच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत एकाही व्‍यक्‍तीचे अतिक्रमण काढले जाणार नाही असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात राज्‍य सरकार सर्वोच्‍च न्‍यायालयात फेरयाचिका दाखल करेल, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

अतिक्रमण बाबतीत महाराष्ट्र भर एक दहशत पसरली होती. त्याला कारण होता एका आदेश. गायरान जमिनीवरील अतिक्रिमण हटवण्यासंदर्भात गावागावात नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, गायरान जमीनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत असा निर्णय आज राज्य घेतला आहे. राज्यातील सुमारे सव्वादोन लाख कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे. गायरान जमिनीतील अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने