आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून आज चोपडा उप जिल्हा रुग्णालयात १ कोटी १२ लाखांच्या रुग्ण सुविधा कामांचे भूमिपूजन..
चोपडा दि.२५(प्रतिनिधी): गोरगरिब, आदिवासी, मागासवर्गीय,बिपीएल धारक चोपडा तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून आमदार निधीतून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात १कोटी १२लाख रुपयांची रुग्ण सुविधा कामांचा भूमिपूजन सोहळा आज दि.२५ रोजी सकाळी ११: वाजता पार पडत आहे.
कामांचे उद्घाटन आमदार सौ लताताई सोनवणे व माजीआमदार प्रा अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते संपन्न होत आहे यात ९२ लक्ष रुपयांचे आय सी यु २० बेड ५० बेड ॲॉक्सिजन पाइपलाईन, सुविधा कक्ष साठी १० लक्ष रुपये तर प्रस्तुती गृह बांधकाम साठी १० लक्ष रुपये असे १ करोड बारा लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आहे.तरी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.