श्री मल्हारी षडरात्रौत्सव निमित्त सामुदायिक श्री मल्हारी सप्तशती पाठाचे आयोजन
धरणगाव,दि.२५(प्रतिनिधी) येथिल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने दि.24 नोव्हेंबर 2022 ते 29 नोव्हेंबर 2022 या काळात सकाळी भूपाळी आरती नंतर सकाळी 8.15 ते 9.30 या वेळेत सामुदायिक श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ होणार आहे.भगवान शंकरांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराय या अवताराची सेवा करुन त्यांची कृपा संपादन करण्यास या ग्रंथांचे पाठ केले जाते. कुटुंबात मुलगा व वडिलांचे जमत नाही, आर्थिक प्रगतीसाठी, नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य अशा अनेक समस्या निवारण्यासाठी श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ करण्यात येत असतात. तरी जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी सामुदायिक पाठात सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव तालुक्याचा वतीने करण्यात आले आहे