आदिवासींच्या समस्या : डॉ.चंद्रकांत बारेला आणि तहसीलदारांची सकारात्मक बैठक
चोपडा दि.२५( प्रतिनिधी ) - तालुक्याचे भूमिपुत्र तथा आदिवासी,दिनदलितांसाठी सदैव लढणारे डॉ. चंद्रकांत बारेला यांनी आज दि.२४ रोजी दुपारी चोपडा तालुक्याचे तहसीलदार अनिल गावीत यांच्याशी आदिवासी बांधवांच्या विविध सोयी, सुविधा,व इतर विषयांवर सखोल चर्चा केली, यात गायरान कायदा,घरकुल योजना,दिव्यांग, विधवा,यांना मिळणारे शासकीय लाभ,शबरी घरकुल,रेशन कार्ड,जॉब कार्ड,उपजिल्हा रुग्णालयात आदिवासी स्वयंसेवक नेमणे,गाव तिथं भिल्ल समाजासाठी दफनभूमी उपलब्द्ध करून देणे,गाव तिथं चावडी योजना राबवणे अशा अनेक मुद्दयांवर चर्चा करण्यात आली.
याबाबत सविस्तर असे की,मागील दि.१८जुलै २०२२ रोजी डॉ.चंद्रकांत बारेला मित्र परिवार व एकलव्य संघटना यांच्या वतीने चोपडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता,त्यामोर्चाचा पाठपुरावा व आढावा बैठक म्हणून आज रोजी चोपडा तहसिलदार अनिल गावीत व डॉ.चंद्रकांत बारेला,एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यात चर्चा करण्यात येऊन तहसीलदार श्री.अनिल गावीत यांनी सगळ्याच मागण्या मान्य करत,फक्त योग्य ती कागदपत्रे आपण सादर करावे,शासकीय योजनांचा लाभ हा प्रत्येकाला मिळेल याची काळजी आम्ही घेऊ,असे आश्वासन दिले.या चर्चेत गायरान हा मुद्दा काही प्रमाणात वगळता,इतर मागण्यांचे स्वागत करण्यात आले
यात डॉ.चंद्रकांत बारेला यांनी सुचवलेली नवीन योजना ' चावडी आपल्या गावी ' यात ग्रामीण भागातील वृद्ध,महीला,पुरुष जे श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना,समाधान योजनायात लाभार्थी होऊ शकतात,पण त्यांच्या पर्यँत या सर्व योजनांची माहितीच नाही,ते सगळे या शासकीय योजनांपासून वंचित आहेत,त्यांचासमावेश करणे,काही गायरान भाग जो की आता पीक कापणीवर आहे,त्यांना योग्य ती समज देऊन जमीन खाली करून घेणे,ज्या काही गावात एम.आर.ई.जी.एस.अंतर्गत मूळ आदिवासी नाव समाविष्ट करून त्यांना जॉब कार्ड देणे.जॉबकार्ड काय व ते कसे काढावे याचे प्रबोधन नाही,तशी जागृती करणे व हातोहात ते काढून देणे,रेशनकार्ड व त्याला अनुषंघून सर्व समस्या सोडवणे,रुग्णसेवा समिती अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयात आदिवासी स्वयंसेवकाची मानधनावर नियुक्ती करणे,अशा मागण्या ज्या तालुकापातळीवर व आमच्या अखत्यारीत आहेत त्या आजच मान्य करतो,फक्त आपण योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करावी जेणेकरून जास्तीत जास्त गरजू लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल, अशी सकारात्मक बैठक आज पार पडली.
आजच्या बैठकीसाठी डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या समवेत एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बापू मोरे,तालुकाध्यक्ष सखाराम सोनवणे,उपाध्यक्ष अप्पा अहिरे,युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे,सुनील भिल,संघटक दुर्यीधन ठाकरे,कार्याध्यक्ष हेमंत वाघ,टायगर फोर्स अध्यक्ष बापू गायकवाड,सुनील अहिरे,अशोक वाघ,राजेंद्र भिल,आधार भिल,डॉ.चंद्रकांत मित्रमंडळाचे अमोल राजपूत,निलेश जाधव, शाम जाधव,सचिन डाभे,सुरेश सुर्यवंशी,ईश्वर भिल,दिपक वानखेडे,सचिन पाटील,विकास निकम,बापू मोरे,यांच्यासह आदिवासी,बांधव, कार्यकर्ते उपस्थित होते.