चोपडा भिमनगरात संविधान दिन साजरा
चोपडा,दि.३०(प्रतिनिधी) येथील मल्हारपुरा भिमनगरात, २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.भिमगर्जना मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमाची सुरुवात त्रिशण पंचशील ने करण्यात आली. मंडळातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून,त्या नंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिका चे सामुहिक वाचन करण्यात आले.
या वेळेस असंख्य समाजबांधव उपस्थित होते.