हातेडजवळ भीषण अपघात २ जण ठार

 

हातेडजवळ भीषण अपघात २ जण ठार


चोपडा,दि.२९(प्रतिनिधी महेश शिरसाठ):
* तालुक्यातील हातेड गलंगी रस्त्यावर पाटचारी - जवळ भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घोडगाव येथील कमलाकर बारेला व कुसुंबा येथील गोलू बारेला हे दोन्ही आपली मोटार सायकल क्रमांक एम एच १९ बी पी ४९४० हिने चोपड्याहून गलंगीकडे जात असताना हातेड गलंगी - रस्त्यावरील पाटचारीजवळ त्यांना मागून येणाऱ्या ट्रकने  जोरदार धडक दिल्याने ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले व त्यांची मोटार सायकल रस्त्यात पडल्याने समोरून येणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ डी एस २८१३ या चालकाने समोरील घटना पाहून अचानक ब्रेक दाबले असता ट्रॅक्टरची ट्रॉली देखील पलटी झाल्याचे समजते. सदर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस मजूर असल्याचे समजते तसेच सदर ट्रॅक्टर ट्रॉली मधील पाच ते सहा मजूर जखमी झाल्याचे समजते तरी मागून धडक देणारा ट्रक व ट्रक चालक फरार झाला असून जखमींवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.कमलाकर बारेला हा घोडगाव येथील असून त्याच्यासोबतचा गोलू बारेला हा कुसुंबा येथील असल्याचे समजते. अपघात इतका भयंकर होता की, त्यांची मोटार सायकल चक्काचूर झाली आहे.
चोपडा तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी रेलच्या मारोती जवळ कंटेनरच्या धडकेत मामा व भाची जागीच ठार झाले होते. चोपडा यावल - रस्त्यावरील देविनी पेट्रोल पंपा जवळ ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने मोटार सायकल सह मनोहर पाटील (कृषी सहाय्यक) ट्रकच्या खाली आल्याने त्यांचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला होता. यांसह अशा अनेक अपघात तालुक्यांत सातत्याने घडत आहेत.अपघाताची मालिकांचं सुरू असल्याने चिंतेचा विषय बनला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने