महात्मा जोतिबा फुले हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत : जयसिंग वाघ
------------------------------------
अमळनेरदि.३०(प्रतिनिधी) : महात्मा जोतिबा फुले यांनी १८व्या शतकात मुलिंची शाळा काढून , अस्पृश्य समाजाकरिता पाणी मोकळे करुन , विधवा स्त्रियांचे विवाह लावून , शैक्षणिक , कृषि , औद्योगिक सुधारणा करुन , अंधश्रद्धा निर्मूलन करुन त्यांनी नवा समाज घडविला त्यामुळे ते आधुनिक भारताचे शिल्पकार ठरतात असे विचार प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .
महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त २८ नोव्हेम्बर रोजी अमळनेर येथील त्रिमूर्ति चौकात आयोजित जाहिर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते
कार्यक्रमाच्या सुरवातीस महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या नंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितलेकि महात्मा फुले हे एक कृतिशील नेते होते , त्यांनी शेतीमध्ये , शिक्षणामध्ये जो आमुलाग्र बदल घडवून आनला त्यामुळे एक नवी क्रांति झाली , शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्यांनी बहुजन समाजास संघटित करुन त्यांच्यात स्वाभिमान रुजविला , सतीप्रथा विरोधी काम केले , महिलांना पुरुशांच्या बरोबरिने सन्मान दिला या व अश्या अनेक कार्यांनी ते इतिहासात अजरामर आहेत .
माजी उपनागराध्यक्ष पांडुरंग महाजन यांनी सुद्धा फुलेंच्या जीवन कार्यवार विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनागराध्यक्ष रामदास शेलकर होते , प्रास्ताविकपर भाषण प्रा अशोक पवार यांनी , सूत्रसंचालन दिनेश चव्हाण , परिचय रणजीत शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा लीलाधर पाटील यांनी केले
मंचावर नगरसेवक सुरेश सोनवणे , मनोहर महाजन , नगरसेविका रत्नमाला महाजन , नगरसेविका तिलोत्तमा पाटील , रख्माबाई महाजन , योगेश महाजन होते
कार्यक्रम यशस्वीते करीता सुनील महाजन , अशोक बिरहाडे , प्रा भीमराव महाजन , अनिल चौधरी , रणजीत बाविस्कर , ईश्वर महाजन, गोकुळ बागुल , गौतम मोरे , संदीप घोरपडे , प्रा एच टी माळी , बंसीलाल भागवत यांनी प्रयत्न केले
कार्यक्रमास स्त्री पुरुष मोठ्या संखेने हजर होते