अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दोन दिवसीय अभ्यास वर्ग संपन्न..!शिंदखेडा शाखा कार्यकारणी घोषित..

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दोन दिवसीय अभ्यास वर्ग संपन्न..!शिंदखेडा शाखा कार्यकारणी घोषित..


शिंदखेडा,दि.२७(प्रतिनिधी)अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे जिल्हा चा दोन दिवसीय जिल्हा अभ्यासवर्ग दि. 19, 20 नोव्हेंबर दरम्यान श्री आशापुरी देवी,पाटण ता. शिंदखेडा, जिल्हा धुळे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

या दोन दिवसीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन दि. १९ नोव्हेंबर शनिवार रोजी झाले. या प्रसंगी प्रा.अमोल मराठे, जळगाव विभाग संघटन मंत्री शुभम स्वामी, जळगाव विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, अभ्यासवर्ग प्रमुख यश मराठे इत्यादी उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित होते. या दोन दिवसीय अभ्यास वर्गाचे प्रास्ताविक प्रा.अमोल मराठे तर विद्यार्थी परिषदेची मांडणी शुभम स्वामी यांनी करून अभ्यास वर्गाला सुरुवात करण्यात आली, या दरम्यान शुभम स्वामी बोलताना म्हणाले की आज अभाविप ने ७५ वर्षात पदार्पण केले आहे व राष्ट्रहिताचे कार्य करणारी विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. .

           या वर्गात विविध प्रकारचे सत्र घेण्यात आले त्यात अभाविप परिचय, कार्यपद्धती, कार्यकर्ता व्यवहार, व्यक्तिमत्व विकास, सांस्कृतिक कार्यक्रम, अभाविप चे महाविद्यालयीन काम, व्यावहारिक प्रशिक्षण, आचार पद्धती व परंपरा  इत्यादी सत्र प्रामुख्याने घेण्यात आले. 

तसेच वर्गात प्रा. उमेश चौधरी यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना 'व्यक्तिमत्त्व विकास' या विषयावर मार्गदर्शन केले. या अभ्यास वर्गाला धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, साक्री या चारही तालुक्यातून 60 -70 विद्यार्थी व विद्यार्थिनी व प्राध्यापक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन दिवसीय अभ्यासवर्गाचा समारोप दि.20 नोव्हेंबर रोजी धुळे जिल्हा संघटनमंत्री ओमकार मोरे यांनी केला.

यावेळी अभाविप शाखा शिंदखेडा ची कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली. यात शहराध्यक्ष पदी प्रा.उमेश चौधरी, शहर उपाध्यक्ष-प्रा.अतुल पाटील, प्रा. रंजीत गिरासे, शहरमंत्री - यश खैरणार, शहरसहमंत्री -ओम माळी,आरती गवडे, कार्यालय मंत्री- कृष्णा देसले, सोशल मीडिया प्रमुख -पार्थ शिंदे, कलामंच संयोजक - सर्वजित गिरासे, SFd संयोजक - स्वप्निल परदेशी, SFS संयोजक -गुंजन जाधव, ज्ञानमंथन प्रमुख - महेश चैधरी, अभ्यास मंडळ प्रमुख - शुभम धनगर, तर सदस्य पदी

अमोल मराठे, ओमकार मोरे, चंद्रकला गावित, यश मराठे निवड करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने