नाशिक आम आदमी पार्टीतर्फे संविधान दिवस साजरा
नाशिक दि.२७(प्रतिनिधी) :26 नोव्हेंबर 2022 रोजी आम आदमी पार्टी निवडणूक समन्वय समितीच्या वतीने संविधान दिन शिवाजी रोड नासिक येथील डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून संविधान प्रस्तावना सार्वजनिक वाचून संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच आज आम आदमी पार्टी चा स्थापना दिवस आज पक्षाचा दहावा वर्धापन दिन हा बेघर निवारा शेड तपोवन येथे बेघरांबरोबर केक कापून साजरा करण्यात आला त्याप्रसंगी एडवोकेट प्रभाकर वायचळे महिला अध्यक्ष श्वेतांबरी आहेर, गिरीश उगले पाटील, योगेश कापसे ,एडवोकेट बंडू नाना डांगे,अनिल कौशिक, अल्ताफ शेख, स्वप्नील घीया, संतोष राऊत, चंद्रशेखर महानुभाव, अमोल लांडगे, दीपक सरोदे, माजीद पठाण,अमर गांगुर्डे, निलेश दिंडे, तुषार थेटे, अल्ताफ शेख,चंदन पवार, प्रदीप लोखंडे,शकील शेख, नितीन भागवत, साहिल सिंग सुमित शर्मा, विकास पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.