ग. स'. च्या मयत सभासदांना संपुर्ण १०० % कर्ज माफी वचनांची पुर्तता - अध्यक्ष उदय पाटील.. ऐतिहासिक निर्णय
*जळगाव दि.२७(प्रतिनिधी महेश शिरसाठ)'* जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची बॅंक (*ग. स'.बॅंक) च्या मयत सभासदांना संपुर्ण १०० % कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला असून आम्ही वचनांची पुर्तता केली आहे. हा सहकार क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय असल्याची अशी माहिती अध्यक्ष उदय पाटील यांनी दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की,सहकार खात्याने मंजुर केलेली पोटनियम दुरूस्ती व कार्यकारी मंडळाने पारित केलेला ठराव क्र. १५ दिनांक १९ / ११ / २०२२ नुसार दिनांक १ डिसेंबर २०२२ पासून मयत झालेल्या सभासदांना कर्ज मर्यादा रू. ६.५० लाख पासुन ते रू.१५.०० लाख पावेतोचे संपुर्ण १००% कर्ज माफीची योजना लागु करण्यात येत असुन त्यांचे जामिनदार देखील कर्जाच्या जवाबदारीतून मुक्त होणार आहेत.तसेच या योजनेतंर्गत ज्या मयत सभासदाकडे कर्ज नाही अशा मयत सभासदास १) कुटुंब सहाय्य निधीतुन रु.५०,०००/- २) जामिनकी फंडातुन रू. ५०,०००/- ३) विशेष फंडातुन रू.५०,०००/- असे एकुण रु.१ लाख ५० हजार मात्र मयत सभासद कल्याण निधीतुन आर्थिक मदत देण्यात येणार आहे. संचालक मंडळाने निवडणुक पूर्व दिलेल्या वचनांची पुर्तता करून घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे मयत सभासदांच्या कुटुंबियांस आर्थिक दिलासा दिलेला आहे.
या महत्वपूर्ण निर्णययासाठी कार्यकारी मंडळाचे सदस्यउदय मधुकर पाटील (अध्यक्ष),्योगेश इंगळे (अध्यक्ष, कर्ज समिती),अजय देशमुख (अध्यक्ष, क.नि. समिती),रविंद्र सोनवणे (उपाध्यक्ष),मंगेश भोईटे (अध्यक्ष, ग.स. प्रबोधिनी),भाईदास पाटील,अनिल गायकवाड, अजयराव सोमवंशी, अमरसिंग पवार,ज्ञानेश्वर सोनवणे, विश्वास पाटील, मनोज माळी ,राम पवार,रावसाहेब पाटील, प्रतिभा सुर्वे, विजय पवार ,जयश्री महाजन,सुनिल सुर्यवंशी, रागिणी चव्हाण, निलेश पाटील ,वाल्मीक पाटील (व्यवस्थापक),अजबसिंग पाटील ,महेश पाटील, योगेश सनेर आदिंनी सहकार्य केले.