चोपड्यात सोमवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा.. हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग

 चोपड्यात सोमवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा.. हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग





चोपडा,दि.२६(प्रतिनिधी) - हिंदु महिलांची सुरक्षा आणि सन्मानासाठी, श्रध्दा वालकर या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच नराधम आफताबला फाशी मिळावी. यासाठी धडक मोर्चाला सोमवारी दि २८ रोजी सकाळी ९:३० वाजता विश्राम गृहापासून प्रारंभ करण्यात येणार आहे.या मोर्चाचे नेतृत्व महिला करणार आहेत हे विशेष!

सोमवारी बाजारपेठ बंद

या बंदला चोपडा तालुका व्यापारी महामंडळाने पाठिंबा दिला आहे.तसेच व्यापाऱ्यांनी सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनतेने या मोर्चात स्वयंस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन हिंदू जागरण मंच,तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने