पाचोरा स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य, मर्क्युरी लाईट लावण्याची मागणी

 पाचोरा स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य, मर्क्युरी लाईट लावण्याची मागणी

 पाचोरा दि.२६ (प्रतिनिधी राजेंद्र खैरनार)सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी पाचोरा नगर परिषदेकडून वेळोवेळी कामकाज केले जाते मात्र याच स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांना अंधाराचा सामना करत अंतिम संस्कार करावे लागतात._*

करण या स्मशानभूमीत लावण्यात आलेले विद्युत दिवे हे अत्यंत कमी व्होल्टेजचे असल्याकारणाने याठिकाणी पाहिजे तेवढा प्रकाश पडत नाही. यामुळे अंत्यविधीसाठी चितेवर लाकडे रचतांना तसेच धार्मिक विधी करतांना  अंधारातच धडपडत वेळ काढून आपला कार्यभाग साधून घ्यावा लागत असल्याने याबाबत सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. म्हणून नगरपरिषदेने या ठिकाणी पुरेपूर प्रकाश पडला पाहिजे यासाठी जास्त व्होल्टेज चे बल्ब म्हणजे मर्क्युरी लाईट लावून जनतेची अडचण सोडविण्यासाठी त्वरित व्यवस्था करावी अशी मागणी पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ता अनिल आबा येवले यांनी केले आहे._

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने