अर्धवट नालीचे काम पूर्ण करण्याची मागणी

 अर्धवट नालीचे काम पूर्ण करण्याची मागणी


अंबाजोगाई दि.२५(प्रतिनिधी ) शहराच्या दक्षिणेला असलेल्या वाघाळा रोडचे काम पूर्ण झाले परंतु त्या बाजूला योगेश्वरी नगरी पर्यंत बांधलेली नाली अर्धवट बांधली असून ती पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे .

    शहराच्या विस्तारीकरणात अनेक नवीन कॉलन्या व घरे वाढ त आहेत . त्यामुळे रस्ता व नाली सर्वांसाठी आवश्यक आहे . अर्धवट सिमेंट नालीचे काम पूर्ण करण्याची खरी गरज आहे . सध्या सिमेंट नाली अर्धवट बांधून ठेवल्यामुळे झंवर यांच्या घराजवळ गटाराचे पाणी साचत आहे . त्यामुळे दुर्घंगी पसरली आहे . त्याभागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .

    अर्धवट बांधलेल्या नालीचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने