नाशिकच्या ॲड. अभिजीत गोसावी यांची आप युवा आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड*

 

नाशिकच्या ॲड. अभिजीत गोसावी यांची आप युवा आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड




नाशिक,दि.२५(प्रतिनिधी) येथील आम आदमी पार्टीचे ॲड. अभिजीत गोसावी यांची पक्षाच्या राज्यनेतृत्वाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केली. या नियुक्तीनंतर 27 वर्षीय ॲड. गोसावी हे पक्षातील सर्वात तरुण विभागीय अध्यक्ष ठरले आहे. 

सोमठाणे सारख्या ग्रामीण भागातून आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या अत्यंत सर्वसामान्य घरातून येणारे ॲड. गोसावी हे 2011 च्या अण्णा आंदोलनापासून अरविंद केजरीवाल यांच्या प्रेरणेने पक्षात कार्यरत होते. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक 2015, 2020 मध्ये थेट दिल्लीत जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या जबाबदाऱ्यांचे पालन केले. त्याचप्रमाणे गोवा व महाराष्ट्रात देखील त्यांनी पडद्याआड राहून पक्षाच्या विविध संघटनात्मक, रणनीतीत्मक, जबाबदाऱ्या सांभाळल्या. तसेच ते नाशिकमध्ये पुरोगामी - परिवर्तनवादी चळवळीत देखील सक्रिय कार्यरत आहे.

 या नव्या जबाबदारी व्यतिरिक्त ते युवा आघाडीच्या मुख्य राज्यप्रवक्ता पदी आधीपासूनच कार्यरत आहे. त्यांचे अलीकडेच पुणे येथे झालेल्या युवा राज्य अधिवेशनातील खासदार संजय सिंग यांच्या उपस्थितीतील भाषण अत्यंत प्रभावी ठरले होते. त्यानंतर खासदार संजय सिंग यांनी विशेष कौतुक केले होते. गुजरात निवडणुकीनंतर पक्षाची केंद्रीय संघटन टीम महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित असल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षाने संघटनात्मक हालचाली केल्याचे बोलले जात आहे.

ॲड. गोसावी यांच्या नियुक्तिनंतर खासदार संजय सिग, राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेमन, प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, युवाध्यक्ष अजिंक्य शिंदे, राज्यसंघटक संदीप सोनावणे, सावन राऊत, स्वप्नील घिया, योगेश कापसे, गिरीश उगले पाटील, ॲड. प्रभाकर वायचळे, आदींसहित विविध स्तरांतून त्यांचे स्वागत केले जात आहे.


 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने