चोपडा येथे ऍव्यूप्रेशर,सूजोक, मॅग्नेट व्हायब्रेशन, थेरपी शिबिराचे मान्यवराच्या हस्ते थाटात उदघाटन*

 चोपडा येथे ऍव्यूप्रेशर,सूजोक, मॅग्नेट व्हायब्रेशन, थेरपी शिबिराचे मान्यवराच्या हस्ते थाटात उदघाटन

चोपडा दि.२६(प्रतिनिधी) भारतीय जैन संघटनाने भव्य ऍव्यूप्रेशर,सूजोक, मॅग्नेट व्हायब्रेशन, थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन समाजातील अनेक मान्यवरांच्या हस्ते दि.२५  शुक्रवार  रोजी मोठ्या थाटात उदघाटन सकाळी १० वाजता करण्यात आले. 

यावेळी प्रा शांतीलाल बोथरा यांचे अध्यक्षतेखाली   संघपती सुभाषचंदजी बरडीया यांच्या हाताने शिबिराचे उदघाटन करण्यात आले त्यांच्या सोबत 

प्रमुख पाहुणे म्हणून संघपती गुलाबचंद देसरडा डॉ निर्मल टाटिया डॉ आर टी जैन ,डॉ. तेजपाल चोरडिया, जैन स्थानक चे अध्यक्ष जतनराज सुराणा, माजी संघपती माणकचंद चोपडा,  जैन समाजाचे सचिव विनोद टाटिया,सुगणचंद बोरा,  उपस्थित होते पीपल्स बँकेचे नूतन संचालक  सुनील बुरड यांची बँकेचे व्हाईस चेअरमन पदी निवड व नेमीचंद कोचर यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा व पत्रकार लतिष जैन यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आले 

        या सात दिवशीय शिबिराचे डॉ.राम मनोहर लोहिया, आरोग्य जीवन संस्थानचे डॉक्टर यांचे द्वारा उपचार रिसर्च ट्रेनिंग व ट्रिटमेंट संस्था (रजी.)हनुमानगढ तज्ञ ऍव्युप्रेशर थेरपिस्ट श्री बी.आर.जाखड(D.A.T.in Acu) श्री.महेंद्र पितांनी (D.A.T.inAcu) यांच्या सह उमेशसिंग ,सुरेश सोलंकी हे विविध आजाराने पीडित रोग्यांना    तपासणी करत आहे शिबिरात 20 ते 80 वयोगटापर्यंत महिला पुरुष लाभ घेत आहे. ही शिबीर सकाळी 8 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहते तसेच आलेले ऍव्युप्रेशर तज्ञाचा  सत्कार  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक राखेचा  व आभार प्रदर्शन आदेश बरडिया यांनी केले 

शिबिर यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन शुभम राखेचा सचिव गौरव कोचर,राहुल राखेचा राजेंद्र टाटिया, दिनेश लोडाया, कोषाध्यक्ष अभय ब्रम्हेचा,  प्रवीण राखेचा, विपुल छाजेड, जितेंद्र बोथरा, दर्शन देसरडा, मयूर चोपडा,क्षितीज चोरडिया, श्रेणीक रूनवाल, चेतन टाटीया आदी परिश्रम घेत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने