श्री.शितलनाथबाबा यात्रोत्सव गोरगावले येथे डॉ.चंद्रकांत बारेला यांनी घेतले आशिर्वाद

 श्री.शितलनाथबाबा यात्रोत्सव गोरगावले येथे  डॉ.चंद्रकांत बारेला यांनी घेतले आशिर्वाद 

चोपडा,दि.०३ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील गोरगावले येथे पवित्र नवरात्रात सप्तमीच्या दिवशी दरवर्षी श्री.शितलनाथबाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने यात्रा भरत असते.आज दि.१ आक्टोंबर रोजी यात्रोत्सवात सहभागी होत डॉ.चंद्रकांत बारेला यांनी शितलनाथबाबांच्या समाधीस्थळाचे तसेच

महादेव मंदिराचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले.

   शितलनाथ महाराजांचे चोपडा,गोरगावले,खाचणे, देवास,उज्जैन अशा पाच ठिकाणी पावन समाधीस्थळे आहेत.पैकी गोरगावले येथे सन १९८३ पासून गावकरी सप्तमीला अविरत यात्रेचे आयोजन, नवमीला गावभंडाऱ्याचे उत्तम आयोजन करत आलेले आहेत.त्यानिमित्ताने लोकाग्रहास्तव आज डॉ.चंद्रकांत बारेला यांनी सायंकाळी गोरगावले येथे जाऊन दर्शन व शुभाशीर्वाद घेतले.यावेळी गावचे सरपंच नामदेव बाविस्कर,माजी सरपंच भगवानआप्पा कोळी,मनोहर पाटील,प्रफुल राजपूत यांच्यासह

मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.गावातील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला यांची भेट घेत आनंद व्यक्त करत विचारपूस केली.

          *आजीबाईंनी दिला आशिर्वाद* 

शितलनाथबाबा समाधीस्थळ परिसरात प्रचंड गर्दी असतांनाही एका वृध्द आजीबाईंनी डॉ. चंद्रकांत बारेला यांना ओळखले, त्यांना जवळ बोलवत आस्थेवाईकपणे,मायेने डोक्यावर हात फिरवत ' बेटा..तुनी मनोकामना नक्की पुरी व्हईन ' शितलनाथबाबा भक्तसनी इच्छा पुरी करस ' असे म्हणत आशिष दिलेत.

 *कार्यकर्ता जोपासणारे डॉ.बारेला*

अचानक ठरलेल्या आजच्या दौऱ्यात घाईगडबड असतांनाही खडगाव येथील अमोल पाटील या निष्ठावान कार्यकर्त्याचा आज वाढदिवस असल्याचे समजताच डॉ.बारेला यांनी त्याच्या घरी जाऊन परिवारासह केक कापून अमोल पाटील यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले.यावेळी अमोल पाटील,त्यांचे आई,वडील व पत्नी मुलं यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याची स्पष्ट भावना सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती.आपल्या विचारांशी पायीक असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला जसा नेता हवा असतो,अगदी तसेच कार्यकर्ता जोपासणारे डॉ.चंद्रकांत बारेला आहेत.हे यावरून स्पष्ट होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने