वीर जवान माजी सैनिक संस्थामार्फत पाचोरा येथे सैनिक मेळावा संपन्न

 वीर जवान माजी सैनिक संस्थामार्फत पाचोरा येथे सैनिक मेळावा संपन्न

पाचोरा,दि.०३  (प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार) शहरातील "राजीव गांधी टाऊन हॉल"मध्ये वीर जवान माजी सैनिक संस्था मार्फत आयोजित सैनिक मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात पाचोरा तालुक्यातील जवळपास 150 माजी सैनिक व 20 ते 22 माजी सैनिक पत्नी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.          

   कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे जळगाव सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण अधिकारी सुभेदार मेजर श्री.अनुरथ वाकडे साहेब यांनी माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराला मिळणाऱ्या आर्थिक सवलती उपाय योजना व येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि आपण पाचो-याकरांसाठी सदैव सहकार्यासाठी हजर राहू असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. तसेच वाकडे साहेबांनी "वीर जवान माजी सैनिक संस्था" यांना संपर्क कार्यालय उपलब्ध होऊन एक महिना ही होत नाही तोवर त्यांनी सैनिक मेळाव्याचे आयोजन करून माजी सैनिकांच्या समस्येंचा प्रश्न उपस्थित करून दिला. म्हणून संस्थेची प्रशंसा केली. या मेळाव्यात पाचोरा नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री. दगडू मराठे साहेब यांनी माजी सैनिकांना नुकतीच जाहीर झालेली मालमत्ता कर सवलती बाबत मार्गदर्शन केले तसेच योजनेबद्दल सविस्तर माहिती देत आलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन सर्व माजी सैनिकांच्या शंकेचे निवारण केले. तसेच या मेळाव्यात SBI बॅंक पाचोरा यांचे प्रतिनिधी श्री. भिमराव पाटील यांनी माजी सैनिकांना SBI  मध्ये येणाऱ्या पेन्शन संबंधी अडचणी वर मार्गदर्शन केले. देवगिरी बँकेचे प्रतिनिधी श्री.गवळी साहेबांनी माजी सैनिकांना  उद्योगांसाठी लागणारी अर्थसहाय्य बद्दल मार्गदर्शन केले.

   पाचोरा तालुक्यातील CA अमोल जैन यांनी सैनिकांना ITR  संबंधी येणाऱ्या अडचणी व ITR फायलींसाठी अनमोल मार्गदर्शन केले तसेच त्यांनी आजी-माजी सैनिकांसाठी "मोफत"  ITR फाईल करण्याची घोषणा ही केली सदरील कार्यक्रमास सुभेदार मेजर श्री.अनुरथ वाकडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव ,श्री दगडू मराठे उपमुख्याधिकारी पाचोरा नगरपरिषद , श्री.बाळू मोतीराम पाटील माजी सैनिक संघ संचालक जळगाव, श्री.प्रमोद पाटील माजी सैनिक अध्यक्ष भडगाव तालुका, वीर जवान माझी सैनिक संस्थेचे अध्यक्ष श्री दिपक पाटील उपाध्यक्ष, श्री मधुकर पाटील सदस्य, श्री रवींद्र पाटील, संदीप पाटील ,गजानन तेली ,अन्सार पटवे ,उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने