गायकवाड क्लासेस मुक्ताईनगर येथे महात्मा गांधी जयंती साजरी
मुक्ताईनगर,दि.०३ (प्रतिनिधी) 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती मोठ्या आनंदमय वातावरणात गायकवाड क्लास मुक्ताईनगर येथे सतीश गायकवाड सर आणि विद्यार्थी, विदयार्थीनी समवेत साजरी करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.क्लास मधील विद्यार्थीनी आणि विदयार्थ्यांनी राष्ट्रपिता विषयी भाषणे केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने क्लास मध्ये निंबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.
क्लास चे संचालक सतीश गायकवाड सर व पूजा मॅडम यांनी बापू विषयी माहिती,शैक्षणिक जीवनात महात्मा गांधीजी चे जीवन किती प्रेरणादायी ठरते याचे बखानविदयार्थी व विदयार्थ्यांन समोर केलेविद्यार्थी आणि विदयार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन अतिशय आनंदमय वातावरणात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.