नाशिक आम आदमी पार्टी तर्फे गांधी जयंती साजरी
नाशिक दि.०३ (प्रतिनिधी): दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी आम आदमी पार्टी नाशिकच्या निवडणूक समन्वय समिती च्या वतीने गांधी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी गांधीजींचे आचार विचार तसेच अहिंसेवर चर्चा करण्यात आली. नाशिक शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने संकल्प करण्यात आला तसेच आम आदमी पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात असलेला कचऱ्याच्या समस्येवर आम आदमी पार्टी नागरिकांशी संवाद कार्यक्रम घेऊन प्रत्येक प्रभागातला कचरा नगरपालिकेला हटवण्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून सांगणार आहे. त्या प्रसंगी पक्षाचे एड. प्रभाकर वायचळे, गिरीश उगले पाटील, योगेश कापसे, अनिल कौशिक, अल्ताफ शेख, अमोल लांडगे, अभिजीत गोसावी स्वप्नील घिया, प्रदीप लोखंडे, अमर गांगुर्डे, नितीन भागवत, प्रकाश कनोजे, नाना उगले, राहुल तुपे, देवराम जाधव, खंडोबा धुळे, हेमंत राऊत, मेघराज भोसले, दिलीप कोल्हे पाटील, प्रवीण पगारे, साहिल सिंग, अविनाश रणवीर, सुशील कुमार शिंदे, विश्वजीत सावंत, पंकज राजहंस, पवन मंडले, महेंद्र मगर, एकनाथ सावळे, पद्माकर अहिरे, शुभम पडवळ. गांधी जयंती निमित्त आम आदमी पार्टी नाशिकचा स्नेह मेळावा कार्यकर्त्यांचा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याच्या आयोजना करता विशाल उगले यांनी मोलाचे सहकार्य केले असे गिरीश उगले पाटील यांनी कळविले आहे.
