चोपडा येथे वर्षावास व्याख्यानमाला-१७ संपन्न
चोपडा, दि.०३(प्रतिनिधी)दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडाच्या वतीने आषाढ पौर्णिमा दि.१३ जुलै २०२२ पासून वर्षावास कार्यक्रमास सुरुवात करण्यांत आली असून दि.२ ऑक्टोंबर २०२२ रविवार रोजी ठिक.५ते६ यावेळेत *गौतम नगर समाज मंदिर चोपडा* येथे वर्षावास पर्वानिमित्त *डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे?* या विषयावर *व्याख्याते-प्राध्यापक आयु. दिलीप सपकाळे* (महात्मा गांधी कॉलेज चोपडा) यांनी या विषयावर सविस्तर संदर्भासह धम्मदेसना देवून प्रवचन दिले.
यावेळी प्रथम शांतीदूत भगवान गौतम बुद्ध,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आयु.सुदाम ईशीअप्पा (मा.सर्कल) व मान्यवरांच्या हस्ते करून त्रिशरण,पंचशिल,बुद्धवंदना म्हण्यांत आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तविक आयु.भरत शिरसाठ (शहराध्यक्ष चोपडा) यांनी केले.वर्षावास कार्यक्रमास जिल्हा संघटक हितेंद्र मोरे,शहराध्यक्ष भरत शिरसाठ,नगरसेवक आयु. अशोकजी बाविस्कर, सामाजिक कार्येकर्त संतोष अहिरे, रमेश गोबा सोनवणे (काजीपुरा),उपाध्यक्ष छोटू वारडे,जेष्ठ सभासद जानकीराम सपकाळे,बसपाचे संजय अहिरे,अनिल वाडे,सुदाम ईशी,माजी तालुकाध्यक्ष सुदाम करनकाळ अप्पा,राजेंद्र पारे(आदर्श शिक्षक तथा बौद्ध साहित्य प्रचार संस्थे जिल्हाध्यक्ष),दिपक मेढे सर, भैय्या बाविस्कर आदी बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते .शेवटी सरणत्तय घेवून आभार रमेश सोनवणे यांनी मानले.
