पंकज विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी...

 पंकज विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी...





चोपडा दि.३१(प्रतिनिधी) :--येथील पंकज विद्यालयात भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यारपण करण्यात आले.एकता व अखंडतेची शपथ घेण्यात आली. तसेच शालेय परिसरात रॅली काढून घोषणा देण्यात आल्या.

सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे योद्धे, दूरदर्शी राजकारणी,  समाजसेवक होते. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणूनही ओळखले जाते. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री झाले. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यलढ्यात जनतेला भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेण्याची प्रेरणा दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार समाजासाठी, युवकांसाठी, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार या देशातील नेत्यांना तसेच प्रत्येक नागरिकाला माहित असणे आवश्यक असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांनी सांगितले.

   सदर कार्यक्रम प्रसंगी पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर आर अत्तरदे , पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील , पंकज माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही आर पाटील यांसह सी एस जाधव , अनिल पाटील , दिलिप जैस्वाल , आर डी पाटील , मयूर पाटील , श्रीमती गायत्री शिंदे , विजया पाटील , उपमा जैस्वाल , आर के माने , जे एस महाजन , एन आर न्हावी , डॉ अरूण मोरे , डी जे बाविस्कर , एम पी पाटिल , विदयार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने