चोपड्यात मोर्या क्रांती संघाची सहविचार सभा संपन्न
चोपडा,दि.३० (प्रतिनिधी) मौर्या क्रांती संघ सकल धनगर समाजाच्या वत्तीने तुळसाई बहुउद्देशीय संचालित मूक-बधिर विद्यालयात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे जेष्ठ नेते विठ्ठल रतन बोरसे होते तर सहविचार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मोर्या क्रांती संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत, जिल्हाध्यक्ष रविंद्र लाळगे,उपाध्यक्ष रमेश शिरसाठ,गोपीचंद शिरसाठ,निळेसर उपस्थित होते.यावेळी उपप्राचार्य बी एस हळपे, उपकार्यकारी अभियंता योगेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर सी भालेराव यांनी तर सुत्रसंचलन पी के नायदे यांनी केले.यावेळी तुळसाई बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक भावलाल पाकळे, मोर्या क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष डि एस धनगर,खुशाल कंखरे , डाॅ अशोक कंखरे, डाॅ निळे, बी जी पाकळे संदिप साळवे,नितीन पाकळे,भगवान नायदे ,रमाकांत धनगर,भगवान् यहीदे नंदलाल सोनवणे,पी एल ठाकरे,जे आर कंखरे,भूपेंद्र धनगर, जिजाबराव कंखरे, प्रविण साळवे, नवल धनगर सचिन सांगोरे प्रविण कंखरे, एस एल मनोरे, आर व्ही सावळे सह समाज बांधव उपस्थित होते