धानोऱ्यात उद्या पालकमंत्र्याचे हस्ते १६ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन.. आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून कायापालट
चोपडा दि.३०(प्रतिनिधी ):* आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले विकास कामांचा भुमिपुजन सोहळा दि. ३१ ऑक्टोबर २०२२सोमवार रोजी,संध्याकाळी ५.०० वाजता पालकमंत्री ना.भाऊसो.गुलाबरावजी पाटील(पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्हा पालकमंत्री) यांच्या शुभहस्ते धानोरा ता. चोपडा येथे होत आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार, चोपडा विधानसभा) वआण्णासो. प्रा. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे (माजी आमदार, चोपडा विधानसभा) हे उपस्थित राहणार आहेत.
धानोरा येथे उपरोक्त पाणी पुरवठा योजना कामासाठीअंदाजित किंमत : रु.१५.९० कोटी (पंधरा कोटी, नव्वद लाख रु.) मंजूर झाले असल्याने गावकऱ्यांनी आमदारांचे आभार व्यक्त केले आहेत.
कार्यक्रमास शिवसेनेचे आजी माजी,पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सेने तर्फे करण्यात आले आहे