भुसावळ अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गरिबांची दिवाळी साजरी.. कपड्यांसह जीवनावश्यक वस्तू वाटप

 भुसावळ अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गरिबांची दिवाळी साजरी.. कपड्यांसह  जीवनावश्यक वस्तू वाटप 

भुसावळ दि.२९(प्रतिनिधी): शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे यावल तालुक्यातील गायरान आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात 175 कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, पुरुषांना कपडे, ब्लॅकेट, आंघोळीचे रुमाल, स्वेटर, फराळ, शैक्षणिक साहित्य,गहू तांदूळ, पणत्या, साबण, अगरबत्ती, बिस्किट, चॉकलेट आणि यांचे वाटप करण्यात आले. 

दीपोत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद तर्फे 'एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गोड करू या' असे आवाहन करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत गोळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील गायरान येथीलआदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला. यंदा उपक्रमाचे सातवे वर्ष होते.प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे, सह समन्वयक अमित चौधरी, विक्रांत चौधरी, भूषण झोपे हे होते. अमोल हरीभाऊ जावळे, योगेश इंगळे, श्रीकांत जोशी, जीवन महाजन, समाधान जाधव, संजय भटकर, प्रसन्ना बोरोले,श्याम माळी, राजु सोनवणे, प्रा.श्याम दुसाने, अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हरीश भट, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, संदीप रायभोळे, दीपक जावळे, शैलेंद्र महाजन, मिलिंद राणे, रुपेश पाटील, राहुल भारंबे, भरत इंगळे, विपीन वारके, ललित महाजन, नितीन लोखंडे, उमेश फिरके, शैलेंद्र वासकर, दिलीप कलाल, किरण नेमाडे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने