"आनंदाची शिधा" कीट वाटपात प्रचंड अफरातफर.. काही वस्तू गायब.. तरीही १००रुपये वसूली करतायं साहेब..! पालकमंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे शामदादा सनेर यांची तक्रार

 "आनंदाची शिधा" कीट वाटपात प्रचंड अफरातफर.. काही वस्तू गायब.. तरीही १००रुपये वसूली करतायं साहेब..! पालकमंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे शामदादा सनेर यांची तक्रार


धुळे दि.२८(प्रतिनिधी): आनंदाची शिधा योजने अंतर्गत अपूर्ण वस्तूंचे वाटप होत असूनि तात्काळ दखल घ्यावी अशी जोरदार मागणी पालकमंत्री श्री.गिरीशभाऊ महाजन  यांच्या कडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामदादा सनेर यांनी केली आहे

  त्यांनी म्हटले आहे की, आजही कारण परत्वे पाँझ मशिन  काम देत नाही तेव्हा दुकानदाराची गैर सोय होतेच.     पण वेळेवर ग्राहकांना धान्य न मिळाल्याने हाल होतात.   दिवाळीच्या पार्श्वभूमीवर  शासनाने शंभर रुपयात रवा, तेल, चना दाळ आणी साखर  देण्याचा निर्णय शासनाने सर्व कार्ड धारकासाठी घोषीत केला . पण पर्याप्त नियोजना अभावी ही योजना पुर्णतः फसली. दिवाळीच्या सण संपूर्ण महाराष्ट्रात पॉज  मशिनने दगा दिला. शिवाय दिवाळी पंर्यत मालाचाच पुरवठा झाला नाही. घाई गर्दीत , साखरेचा पूरवठा झालाच नाही. काही ठीकाणी दाळ ऊपलब्ध झाली नाही.  त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यात खटके ऊडून  दिवाळी कडू झाली.     वेळेवर पुरवठा न होण्याचे मुख्य कारणही मनःस्ताप देणारे होते ज्या थैली मधुन हे धान्र द्यायचे होते त्या थैल्यांवर.पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री शिंदे जी आणि उप मुख्यमंत्री फडणविस जी यांचे फोटो छापले गेले नव्हते .ते छापले गेल्यावर पीशव्या ऊपलब्ध झाल्यात त्यात दिवाळी ऊजाडली.   प्रत्यक्षात साखर न देताच 100रुपये घेण्यात आले.  साखरे अभावी दिवाळी गोड होण अशक्य ती कडू झाली आणि योजना फसली. शंभर रुपये घेऊनही रवा, चनाडाळ,तेल साखर या वस्तूंपैकी पूर्णतः वाटप होत नसताना शंभर रुपयाची वसुली मात्र होत आहे सदर बाब अत्यंत अन्यायकारक आहे साखर व तेल जिल्ह्यातच उपलब्ध नसल्यामुळे पैशांची वसुली थांबवण्यात यावी ज्या ज्या नागरिकांना चार वस्तूंपैकी अपूर्ण वस्तू मिळाले असल्यास त्यांचे पैसे परत करण्यात यावे ही  विनंती केली आहे.यावेळी जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष शामकांत सनेर, युवराज करणंकाळ,प्रकाश पाटील,राजेंद्र देवरे, डॉ भरत राजपूत, नरेंद्र पाटील, धनंजय कुवर, सचिन पवार, भूषण भदाणे आदी उपस्थित होते 

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे धुळे जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आनंद शिधा वाटप या योजने अंतर्गत साखरं व गोड तेल होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले व नागरिकांकडून 100 रुपये वसुल केले जात आहे शासन पूर्ण वस्तू देत नाही वरून 100रुपये वसुल करीत आहे सदर बाब मंत्री महोदयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ही याबाबत सकारात्मक असा प्रतिसाद दिला व या योजनेबद्दल खंत ही व्यक्त केली सदर योजनेच्या संदर्भात घाई  झाल्यामुडे अडचणी निर्माण झाल्या आहेत परंतु शासन निश्चित सर्व वस्तू जनतेपर्यंत निश्चित पोहचेल. गोडेतेल मिळत नव्हते परंतु गौतम अडाणी यांनी तेल उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री महाजन म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने