भाऊबीजला भावावर काळाची झडप.. भीषण अपघातात मामा-भाचीचा मृत्यू..तर बहिण अत्यवस्थ..दीड वर्षाच्या बालकाचे नशिब बलवत्तर..

भाऊबीजला भावावर काळाची झडप.. भीषण अपघातात मामा-भाचीचा  मृत्यू..तर बहिण अत्यवस्थ..दीड वर्षाच्या बालकाचे नशिब बलवत्तर..

चोपडा / धरणगाव दि.२८(प्रतिनिधी) भाऊबीज साठी आपल्या घरी बहिणीला दुचाकीवर घेऊन जाणाऱ्या  भावाचा सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दूर्दैवी मृत्यू झाला असून सोबत असलेल्या पाच वर्षीय चिमुरडी भाचीचीही प्राण ज्योत मालवल्याची  अंगावर शहारे आणणारी घटना रेलचा मारोती जवळ  घडली. सुदैवाने दीड वर्षाचा लकी हा लकी ठरला आहे."देव तारी त्यास कोण मारी"यांचा  प्रत्यय प्रत्यक्ष दर्शींना आल्याने भगवंत मारोतीरायास न कळत हात जोडल्याचे चित्र होते.मयत विधीची आई संगिता बाई कोळी ह्यांना जबर दुखापत झाल्याने चोपडा उपजिल्हा रुग्णालयातून मोरेश्वर हॉस्पीटलला हलविण्यात आले  तद्नंतर झटके येत असल्याचे कारणाने पुढील उपचारार्थ
जळगाव येथे हलविण्याची तयारी उशिरापर्यंत सुरू होती
.



चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ आज दुपारी समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे मामा-भाची जागीच ठार झालेत. मयतांमध्ये सहा वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.
या संदर्भात अधिक असे की आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र. एमएच 19 सीएच 5174) ला समोरून येणारा ट्रक (क्र. एचआर 56 बी 4688) ने जोरदार धडक दिली. या अपघातात एक सहा वर्षीय विधी कोळी नामक बालिका जागीच ठार झाल्याचे कळते. तर दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) आणि एक महिला गंभीर जखमी आहे तर दीड वर्षीय चिमुकला मात्र, सुखरूप असल्याचे कळते. अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दुतर्फा वाहतूक काही काळासाठी प्रभावी झाली होती. दरम्यान, शेवटची वृत्त हाती आले तेव्हा जखमी महिलेला जळगाव हलविण्यात आले होते. तसेच मयत हा आपल्या बहिणीला घेऊन विरवाडे ता. चोपडा येथून आपल्या घरी जात होता, असेही कळते. शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा घटनास्थळी सपोनि संतोष चव्हाण, पोहेकॉ प्रदीप राजपूत, पोहेकॉ जितेंद्र चव्हाण, पोकॉ प्रमोद पवार, पोना हेमत कोळी कर्मचारी जात पुढील कार्यवाही सुरु केली होती.

*अडीच वर्षांचा लकी  ठरला लकी*  ---
आज चोपड्या पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील रेल मारुतीच्या घोलवर मोटारसायकल आणि ट्रकचा अपघातात अडीच वर्षांचा लकी विनोद कोळी याला काहीच दुखापत झाली नाही मात्र आई सौ.संगीता विनोद कोळी ही महिला जखमी आहे.तिचे उपचार एका खाजगी रुग्णालयात सुरू होते. तर लकीची मोठी बहीण विधि कोळी आणि मामा बापू रामचंद्र कोळी हे दोघे जागीच मयत झाले आहे.

*जखमी संगिता हलविले जळगावी*
दरम्यान मयत बाळू ची बहिण संगीताताई विनोद हिस प्राथमिक उपचारानंतर मोरेश्वर हॉस्पीटलला भरती करण्यात आले होते त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलविण्याची प्रकिया सुरू असल्याची माहिती नातेवाईकांअडून मिळाली.
*बाळुची ठरली अखेरची भाऊबीज*
मयत बाळू रामचंद्र कोळी रा.दहिदुल्ले,ता.धरणगाव हा हात मंजुरी करणारा होता. "भाऊबीज"चेऔचित्य साधत आपल्या बहिणीला घेण्यासाठी विरवाडा गावी सकाळीच आला होता.दुपारी बहिणीस व भाचा-भाचीला घेऊन तो आपल्या घरी जात असताना काळाने झडप घातल्याने दूर्दैवी मृत्यू झाला.त्यामुळे बिचाऱ्या भावाची ही शेवटची भाऊबीज ठरली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने