आंदळवाडी येथे महर्षी वाल्मिकी कोळी संघटनेची बैठक संपन्न
जळगाव -,दि.३१(प्रतिनिधी) महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून नगरपालिका नगरसेवक अंबादास कोळी , यांचा सत्कार संघटनेच्या अध्यक्षांनी केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंदा कोळी यांनी मांडले कार्यक्रमात संघटनेचा इतिहास सांगण्यात आला ग्रूप हा एक व्हॉट्सॲप द्वारे दिनाक 16/12/2021 ला माननिय किरण भगवान सपकाळे,(कानळदा) यांनी ग्रुपच वुक्ष रोपून आज त्या ग्रुपची वटवुक्षता रूपांतर झाले आसून आज ती एक मोठी संघटना झाली असून या संघटनेचे अध्यक्ष नारायण कोळी, उपाध्यक्ष वासुदेव कोळी , कार्य आध्यक्ष देवेंद्र कोळी, सचिव
रवी कोळी, यासारखे इतर कार्य करणी सदस्य सभेला आवर्जून उपस्थित होते तसेच समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते
सभेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, तसेच सामूहिक विवाह सोहळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच समाजाचे इतर काही समस्या, यासारखे उद्दिष्ट मांडण्यात आले
सामाजिक आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात समाजाचा विकास कसा गाठला जाईल यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली
कार्यक्रमाची सांगता भोजनाने करण्यात आली