डॉ विजय पोतदार यांचा न्याती रत्न पुरस्कार देऊन सन्मान
गणपुर (ता चोपडा)ता 22: चोपडा शहरातील विवेकानंद हॉस्पिटल चे नामांकित डॉ. विजय भगवानदास पोतदार यांचा खानदेश लाड केळवाणी मंडळ धुळे च्या कार्यक्रमात चोपडा निवासी (हल्ली मुक्काम भिवंडी) स्वर्गीय अशोकभाई दामोदरदास लाड यांच्या स्मरणार्थ ' न्याती रत्न' समाज सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शोभनाबेन लाड, ऍड. पराग लाड, शिल्पा हितेश वाणी यांनी त्यांचा सत्कार केला. खानदेश लाड केळवाणी चे उपाध्यक्ष विनोद भाई, ऍड. संजय वाणी , समाजसेविका सुरेखा वाणी व खानदेश विभागातील सर्व समाजबांधवांकडून डॉ.विजय पोतदार यांनी वैद्यकीय क्षेत्रात चोपडा तालुक्यात दिलेल्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाला खानदेशातील समाज बांधव उपस्थित होते.......
.धुळे............डॉ विजय पोतदार यांचा सत्कार करतांना ऍड पराग शाह,विनोद भाई,ऍड संजय वाणी व मान्यवर