आम आदमी पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचवा... जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे
चोपडा,दि.०२( प्रतिनिधी ):--- येथील शासकीय विश्रामगृहात जळगाव जिल्ह्याचे सहसंयोजक विठ्ठलराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पक्षाची बैठक उत्साहात संपन्न झाली.
२७ सप्टेंबर रोजी जळगाव येथे जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.सदर मेळावा १०० % यशस्वी झाल्याबद्दल जिल्हा उपसंयोजक विठ्ठलराव साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले . चोपडा विधानसभा मतदारसंघात ३१९ बूथ केंद्र आहेत. प्रत्येक बूथ केंद्रांवर किमान १० सक्रिय कार्यकर्ते तयार करावेत व वन बूथ - ट्रेन युथ ही संकल्पना लक्षात ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय कार्य करीत राहावे व डिसेंबर अखेर चोपडा तालुक्यांतून किमान ५००० सक्रीय सभासद नोंदणी करावी , येणाऱ्या सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे संघटन वाढवावे अशा प्रकारचे आवाहन जिल्हा उपसंयोजक विठ्ठलराव साळुंखे यांनी बैठकीत केले.
सदर बैठकीसाठी विठ्ठलराव साळुंखे ( जिल्हा सहसंयोजक ) , आर डी पाटील ( तालुका संयोजक ) , सुधीर पाटील ( शहर संयोजक ) , समाधान बाविस्कर ( तालुका उप संयोजक ) ,राकेश पाटील ( तालुका सचिव ) , रामचंद्र भालेराव ( शहर सचिव ) , समाधान भालेराव , शैलेंद्र पवार, वेडूराम बारेला , झाऱ्या बारेला यांसह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीत विठ्ठलराव साळुंखे, सुधीर पाटील, समाधान बाविस्कर, रामचंद्र भालेराव आदींनी आपले मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर डी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश पाटील यांनी केले...