हिवरा नदी पूल झाला पार्किंग पूल..न.पा.प्रशासनाचे मात्र लक्ष गूल..!

हिवरा नदी पूल झाला पार्किंग पूल..न.पा.प्रशासनाचे मात्र लक्ष गूल..!

पाचोरा,दि.०२ (प्रतिनिधी राजेंद्र खैरनार)पाचोरा शहरातील कृष्णापुरी हिवरा नदी वरील हिवरा पुलाला शनिवार बाजारच्या दिवशी  पार्किंग चे स्वरुप येते.त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो तरी  न.पा.प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील कृष्णापुरी हिवरा नदी वरील "हिवरा पुला"ला शनिवार बाजारच्या दिवशी येतो पार्किंग चे स्वरुप यावर न.पा.प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी..,पायी चालणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना  होत आहे त्रास तरी  न.पा.प्रशासनास विनंती आहे की दर शनिवारी आठवडा बाजार   भरतो आपण "वाघ डेअरी ते भारत डेअरी पर्यंत बाजार& भाजीपाला ची दुकाने अतिक्रमण चे प्रमाण कमी झाले आहे,,परंतु शहरातील हिवरा नदी चा नुतनीकरण करण्यात आलेला पुल हा खेड्यापाड्यातून येणा-या सर्व नागरिकांचा मुख्य "दुवा" आहे तरी आता आठवड्याचा बाजार करणारे वाहनधारक हे "हिवरा पुलाचा" वाहन लावण्यासाठी "पार्किंग म्हणुन करत आहेत उपयोग,, उपयोग करतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहकांना व पायी चालणाऱ्या महिला, नागरिक यांना खुप  कसरत करावी लागत आहे तरी प्रशासनाने हिवरा नदी पुलावर मोटारसायकल लावण्यास बंधनकारक करायला हवं तरी न.पा.प्रशासनाने यांच्यावर उपाययोजना करावी व करण्याची अत्यंत गरज आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने