घोडगाव विकास सोसायटी तज्ज्ञ संचालक राजेंद्र पाटीलांचा माजी आमदार कैलास बापूंच्या हस्ते सत्कार
गलंगी,ता. चोपडा दि.०२(प्रतिनिधी): परिसरातील घोडगाव येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या नुकत्याच घेतले गेलेल्या तज्ञसंचालक राजेंद्र पांडुरंग पाटील यांच्या सत्कार माजी आमदार कैलासबापु पाटील यांच्या हस्ते चोपडा येथील सुतगिरणीच्या ऑफिसात करण्यात आला. या छोट्या खानी कार्यक्रमात माजी आमदार कैलासबापु पाटील यांनी सहकार क्षेत्रात अभ्यासु माणसाची गरज आहे, ही निवड योग्य आहे, व राजेंद्र पाटलांनी सक्रिय राजकारणात सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चोपडा सुतगिरणीचे संचालक तुकाराम पाटील, शेतकी संघाचे माजी उपध्यक्ष प्रल्हादआप्पा धप्पा पाटील, संचालक प्रकाश रजाळे,घोडगावचे माजी सरपंच संजय पाटील ,माजी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील ,नादान पावरा, विवेक पाटील ,बन्सीआप्पा ठाकूर, सुनील पाटील, आनंदा बाविस्कर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते