प्रा. रमाकांत धनगर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार ..!
गलंगी,ता.चोपडा दि.०२:--(प्रतिनिधी)अविष्कार सामाजिक व शैक्षणिक संस्था कोल्हापूर यांच्यामार्फत दिला जाणारा "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२२" हा तालुक्यातील हातेड येथील श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. रमाकांत गोटन धनगर यांना श्रीवर्धन (जि. रायगड) येथे जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री व आमदार श्रीमती आदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नाट्य कलाकार रवींद्र चौधरी-पाटील अध्यक्षस्थानी होते.अविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार,संदीप नागे, प्रा. संतोष भोसले, राजेश सुर्वे, महमद शेख, विजय कचवे,आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव निलेश भोईटे, शालेय समिती चेअरमन संदीप सोनवणे, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, आर एच बाविस्कर, मुख्याध्यापक पी.सी. पाटील व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे
फोटो :--श्रीवर्धन (जि. रायगड) येथे प्रा रमाकांत धनगर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करतांना आमदार श्रीमती आदिती तटकरे शेजारी पदाधिकारी..