*काँग्रेस पक्षातर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन*
चोपडादि.०२ ( प्रतिनिधी) चोपडा शहर व तालुका काँग्रेस तर्फे 2 ऑक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रपिता महात्माजी गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूरजी शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. चोपडा येथील गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते एडवोकेट संदीप सुरेश पाटील यांनी जगाला आजही महात्मा गांधींचे विचारच तारतील असे प्रतिपादन केले. यावेळी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के. डी. चौधरी, चोपडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप निंबा पाटील, जिल्हा काँग्रेसचे माजी सरचिटणीस व प्रदेश सेवा आघाडीचे उपाध्यक्ष श्री अजबराव पाटील, अनिल पाटील, एमपीसीसी उत्तर महाराष्ट्र परिवहन सेलचे अध्यक्ष देवकांत के.चौधरी, एन एस यु आय प्रदेश सह्सचिव चेतन बाविस्कर, चोपडा शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष एडवोकेट एस. डी. पाटील, रोहन पाटील, संदीप पाटील, धनंजय पाटील, श्याम शिंपी, देवानंद शिंदे, आदी असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.