चोपड्यात जन संघर्ष मोर्चा भ्रष्टाचार करणार उघड ..माय-बाप जनतेने सहभागी होण्याचे आवाहन
चोपडा दि.०३(प्रतिनिधी): तालुक्यातील नगर पालिकेकडून व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेली रस्त्याची काम व जनतेसाठी होत असलेली सार्वजनिक काम, रस्त्यावर पडलेले खड्डे व ते भरण्यासाठी भराव करून कोट्यवधी रुपयांचे बोगस बिल काढली जातात कामा फक्त लाखांची असतात या संदर्भात आम्ही जन संघर्ष मोर्चा गठीत करीत असून शहर व तालुक्यातील मायबाप जनतेने या अधिकार्यांचा भ्रष्टाचार हाणून पाडण्यासाठी जनहित कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जनसंघर्ष मोर्चात सामील व्हावे या संदर्भात ऍण्टी करप्शन विभाग महाराष्ट्र त्यांची व व्हिजिलन्स डिपार्टमेंट महाराष्ट्र यांचीसुध्दा मदत घेणार आहोत असे अमृतराज सचदेव, डॉ रवींद्र पाटील स्पष्ट केले आहे. सर्व सन्माननीय मायबाप जनता जनार्दन ज्यांना सामील व्हायचे आहे त्यांनी नाव व नंबर आमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे