चौगाव गडावर दिवाळी निमित्त दिपोत्सव साजरा
चोपडा,दि.२५ (प्रतिनीधी) दिवाळी निमित्ताने "एक दिवा राजेंच्या गडकिल्ल्यांना "या उपक्रमांतर्गत विजयगडावर दिपोत्सव साजरा करण्यात आला.या दिपोत्सवाला २८ मावळे,३ बालमावळे,२ रणरागिणी व १ बालरणरागिणी असे एकूण ३४जणांनी हजेरी लावली.इतिहास संशोधक व लेखिका सौ.सरला भिरूड मँडम यांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला.सुरवातीला श्रीक्षेत्र त्रिवेणी मंदिरावर पुजन करून विजयगडावरील पुर्वाभिमुख व उत्तराभिमुख दरवाज्यांचे पुष्पहार लावून व रांगोळी काढून पुजन करण्यात आले व नंतर गडावर भटकंती करण्यात आली.या भटकंतीत दगडाचे घडीव जाते,उखळ,दगडी मुसळी आढळून आले.गडाच्या इतिहासाविषयी बुरूज,तटबंदी,कोरीव लेणी या विषयी इतिहास संशोधक व लेखिका सौ.सरला भिरूड मँडम यांनी सविस्तर माहीती दिली.यावेळी त्यांनी अशीरगड,लासुर येथील साखरबाहूली ,श्रीक्षेत्र नाटेश्वर मंदिर व सत्रासेन येथील खासरागड या विषयी सविस्तर माहीती दिली.विजयगडानंतर त्यांनी लासुर येथील साखर बाहुली व नाटेश्वर मंदिराला भेट दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन टीम एक्सप्लोर खांदेशचे रुषीकेश पवार,चोपडा एम एच १९चे निलेश भंगाळे,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चोपडाचे अध्यक्ष जिग्नेश कंखरे,चौगाव वन व्यवस्थापण समितीचे व ऐतिहासिक वारसा संवर्धन क्रुती समितीचे सदस्य उपस्थीत होते.यावेळी इतिहास संशोधक व लेखिका सौ.सरला भिरूड यांनी लिहीलेले "तोरणमाळ"हे पुस्तक उपस्थीतांना भेट म्हणून देण्यात आले.