अकुलखेडा गावी महर्षी वाल्मिकी ऋषीं यांची जयंती जल्लोषात साजरी.. माजी सभापती गोपाळराव सोनवणे यांच्या हस्ते झाले प्रतिमा पूजन*

 


अकुलखेडा गावी महर्षी वाल्मिकी ऋषीं यांची जयंती जल्लोषात साजरी..
माजी सभापती गोपाळराव सोनवणे यांच्या हस्ते झाले प्रतिमा पूजन*

चोपडा दि.२५ (प्रतिनिधी) :- शहरा लगत असलेल्या अकुलखेडा गावी    रामायणकार आद्यकवी गुरुदेव महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती  गावभर भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढून धुमधडाक्यात साजरा करण्यात आली.
मिरवणूकीच्या प्रारंभी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.गोपाळराव सोनवणे यांच्या शुभहस्ते महर्षी वाल्मिकी ऋषीं यांच्या प्रतिमा पूजन करून  वाजत गाजत मिरवणूकीस सुरुवात करण्यात येऊन प्लाॕट भाग, कोळी वाडा, बौद्ध वाडा, मराठा समाज वाडा,गुजर वाडा अशी संपूर्ण गावभर मिरवणूक काढण्यात आली शेवटीं पाण्याच्या टाकीजवळ येत मान्यवरांची भाषणे होऊन समारोप झाला.
कार्यक्रमास माजी सभापती गोपाळराव सोनवणे,माजी पं.स.सदस्य रामसिंग अमरसिंग पवार,लक्ष्मण कोळी, अंबादास कोळी, बलवान कोळी,निलगावचे पोलिस पाटील विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मिरवणूकीत महिला -पुरुष व तरुण मंडळी प्रचंड संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस कर्मचारी मधुकर पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने