कोळी समाजाचे जेष्ठनेते सितारामबापु देवराज यांना "समाजमहर्षी" चा मानसन्मान..तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी मांडली संकल्पना.

कोळी समाजाचे जेष्ठनेते सितारामबापु देवराज यांना "समाजमहर्षी" चा मानसन्मान..तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी मांडली संकल्पना.


*चोपडा,दि.२५ (प्रतिनिधी):-*  तालुक्यातील गलंगी येथील प्रगतिशील शेतकरी, पं.स.चे माजी सभापती व कोळी समाजाचे जेष्ठनेते सिताराम गोबाजी देवराज उर्फ सितारामबापू यांना त्यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त *समाजमहर्षी* ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. कोळी समाजाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवलेकर) यांनी ही संकल्पना मांडली. त्यास सुचक म्हणुन माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे तर जि.प.चे माजी प्रभारी अध्यक्ष छन्नु झेंडु पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी टाळ्या वाजवुन तसेच त्यांचा शाल श्रीफळ हारगुच्छं देऊन यथोचित सत्कार केला.

 सिताराम देवराज यांनी आदर्श घरपरिवारासह प्रगत शेती करून समाजाची सेवाही केलेली आहे. राजकारणात पद पैसा व खुर्ची मागे न धावता शांत संयमी सुस्वभावी व नि:स्वार्थी राजकारणी नेता म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे.या सर्वच गोष्टींचा विचार करून त्यांना वयाच्या ९३ व्या वर्षी "समाजमहर्षी" ही पदवी बहाल करण्यात आली. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी सांगीतले की, तालुक्यातील जेष्ठ नेते व माजी आमदार स्व.सुरेशदादा पाटिल यांना शिक्षणमहर्षी तर चो.सा.का.संस्थापक अध्यक्ष स्व.धोंडुआप्पा पाटिल यांना सहकारमहर्षी असे म्हटले जाते. तसे यापुढे कोळी समाजाचे जेष्ठनेते सितारामबापु देवराज यांना "समाजमहर्षी" म्हणुन संबोधण्यात येईल. अशी माहिती चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर  यांनी ह्या पत्रकांन्वये दिली आहे.

       याप्रसंगी माजी आमदार कैलास पाटील, घनश्याम पाटील, संदिपभैय्या पाटिल, इंदिराताई पाटील, शांताराम पाटील, वसंत चौधरी, प्रवीणभाई गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी, आशिषभाई गुजराथी, गिरीष पाटील, सुरेश पाटील, नारायण पाटील, नंदकिशोर पाटील, ए.डी.चौधरी, लोटन पाटील, राजु देशमुख, पप्पु पाटिल, डी.पी.साळुंखे, शांताराम सपकाळे, आनंदराव रायसिंग, बाळासाहेब सैंदाणे, तुळशीराम पाटील, कवी अशोक सोनवणे, बी.जी.पाकळे, पंडित सपकाळे, मनिलाल पाटील, मनोज सनेर, देवाजी सोनवणे, शशिकांत देवरे, दत्तात्रय पाटील, सुभाष रायसिंग, मोतीलाल रायसिंग, लोटन पाटील, रामभाऊ बाविस्कर, लखिचंद बाविस्कर, राजेंद्र रायसिंग, प्रकाश सपकाळे, लक्ष्मण सपकाळे, गोकुळ पाटील दिलीप शिरसाठ, पंडित शिरसाठ, जवरीलाल जैन, सदाशिव पाटील, नवल पाटील, सुनील देवराज, नवल देवराज, आत्माराम कोळी, दिलीप पाटील, मच्छिंद्र कोळी, रंगराव देवराज, छगन देवराज, सतीश देवराज, मधुकर देवराज, यांचेसह गांव व पंचक्रोशितील ग्रामस्थं  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवराज परिवारातर्फे महाप्रसाद भोजन भंडाराचेही आयोजन करण्यात आलेले होते. चोपडा पं.स.चे माजी उपसभापती सुभाष रायसिंग व हातेड बु. प्रा.आ.केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रमोद देवराज यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने