गुरांच्या गोठ्याला आग चारा व शेती अवजारे जळून खाक..!वरगव्हाणच्या शेतकऱ्यांवर अपघाती संकट.. शासकीय स्तरावर मदतीची मागणी
चोपडा,दि.२५ (प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गावातील संदीप संतोष पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याला रात्री अचानक लागलेल्या आगीत प्रचंड नुकसान झाले असून प्रशासकीय स्तरावर दखल घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.ऐन दिवाळी च्या दिवशी ही आग लागल्याने सदरील शेतकऱ्यांची दिवाळी उजळण्या ऐवजी अंधारात गेलीं आहे.
सविस्तर वृत असे की, वरगव्हाण गावात गावातील मध्य ठिकाणी संदीप संतोष यांचे गुरांचा गोटा असुन एक बैलगाडी व शेती अवजारे ठेवण्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्या मालकीचा गोठा होता.
प्रथम दर्शी यांच्या कडून
प्राथमिक माहिती अशी की त्यांनी गुरांना खाण्यासाठी मक्का व ज्वारी ची कुट्टी साठवली होती, काल अचानक रात्री सोमवारी 11 वाजच्या सुमारास भिषण आग लागली गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली .
त्या आगीत त्यांचे शेतीसाठी लागणारे साहित्य त्यात दोन लाकडी वक्खार, 2 लोखंडी नांगर, गोठ्यासाठी जे पत्री शेड होते त्यांचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,
ऐन दिवाळीच्या दिवशी रात्री त्यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून काही तरी मदत मिळावी ही मागणी संदीप पाटील करत आहेत